एस. टी. वेळेत येत नाही. मग आंदोलन का केले नाही ?

उंडाळे : कराड एस. टी. आगाराच्यावतीने मुक्कामी सोडण्यात येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले असून इतर गाड्याही वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कराड आगारप्रमुखांकडे प्रवाशांनी याबाबत तक्रार केली असता आगार प्रमुखाकडून 'बस वेळेत नाही येत नाही, मग आंदोलन का केले नाही?' असा अजब प्रश्न विचारला जातो. त्यामुळे प्रवासीवर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कराड तालुक्यात कराड आगाराच्यावतीने कराड, चांदोली, शेडगेवाडी येळगाव, भुरभुशी, येवती, घराळवाडी, जिंती, मलकापूर या सर्व विभागात एसटीचे जाळे मोठ्या प्रमाणात असून या विभागात सातत्याने अपवाद वगळता एस. टी. चे वेळापत्रक कोलमडलेले असते अनेकदा एस. टी. बस वाटेतच बंद पडलेल्या असतात, इतकेच काय, पण एस.टी. ने दिलेल्या टाइमिंगपेक्षा या गाड्या किमान वीस ते तीस मिनटांपेक्षा पेक्षा अधिक उशिरा धावतात. तर अनेकवेळा रात्री मुक्कामासाठी गेलेल्या गाड्या कधीही वेळेत येत नाहीत. त्यापैकी भूरभूशी-कराड (कॉलेज) ही मुक्काम गाडी उंडाळे येथे सहा वाजून दहा ते पंधरा मिनिटांनी येत असताना ही गाडी कधीही वेळेवर येत नाही. ती नेहमीच अर्धा तास उशिरा धावत असते. त्यामुळे या बसने प्रवास करणाऱ्या शिक्षक व इमरर्सन कंपनी कर्मचारी नोकरदार, कॉलेजचे विद्यार्थी यांना ताटकळत बसावे लागले व खाजगी प्रवाशी वाहतुकीचा आधार लागतो. या बाबत या विभागातील प्रवासीवर्गाने कराड आगारप्रमुखांना गाडी उशिरा येत असल्याबद्दल तक्रार व विचारना केली असता, आगारप्रमुखांनी मुक्काम गाडी वेळेवर येत नाही, मग तुम्ही रस्ता- रोको आंदोलन का केले नाही ? असा अजब आणि उलटा प्रश्न विचारून प्रवाशांची बोलती बंद केली. त्यामुळे आगारप्रमुखांना नेमके बस वेळेवर येण्यासाठी आंदोलन हवे का ? असा प्रश्न प्रवासीवर्गातून होत असून या वक्त्यावर संताप व्यक्त होत आहे. जर आगारप्रमुखांना आंदोलनात हवे असेल तर मग दररोज कराड आगारातून एकही बस बाहेर पडणार नाही, हे आगारप्रमुखांना केव्हा कळणार. एवढा गलथान कारभार कराड आगारात आहे, याचा तरी साधा विचार करायला पाहिजे, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. आगारप्रमुखांच्या कार्य पध्दतीमुळे प्रवासीवर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून मुक्काम बस व अन्य गाड्याचे वेळापत्रक सुधारूण एस. गाड्या वेळेत सोडाव्यात, अशी मागणी प्रवासीवर्ग विद्यार्थीवर्गातून होत आहे.


Popular posts
जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी पतसंस्था घेणार – शेखर चरेगांवकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा शब्ब-ए-बारातसाठीही बाहेर न पडण्याचे आवाहन हनुमान जयंतीला आपापल्या घरातच थांबा -उपमुख्यमंत्री अजित पवार
शासकीय कर्मचारी,व अधिकाऱ्यांची सुरक्षितता जपण्या साठी त्यांना या सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे जल संपदामंत्री,व सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री ना.जयंतराव पाटील
Image
अवैध मद्य विक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरू; एका दिवसात सुमारे 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त