उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा

मुंबई, दि. 7 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत असताना जागतिक आरोग्याचे आणि आरोग्य संघटनेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


'आरोग्यम् धनसंपदा’, आरोग्यासारखे धन नाही, असे मानणारी आपली संस्कृती आहे. परंतु जागतिकीकरणाच्या काळात, आधुनिक जीवनपद्धतीत वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीने, सार्वजनिक, जागतिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. कोरोना संकटाच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.  यापासून धडा घेऊन भविष्यात वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीने सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आपण सर्वजण कटीबद्ध होऊया, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


Popular posts
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा शब्ब-ए-बारातसाठीही बाहेर न पडण्याचे आवाहन हनुमान जयंतीला आपापल्या घरातच थांबा -उपमुख्यमंत्री अजित पवार
अवैध मद्य विक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरू; एका दिवसात सुमारे 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यात भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत
शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फ्रॉम होम’ शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक
जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी पतसंस्था घेणार – शेखर चरेगांवकर