हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा शब्ब-ए-बारातसाठीही बाहेर न पडण्याचे आवाहन हनुमान जयंतीला आपापल्या घरातच थांबा -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 7 :- कोरोनाचे संकट पाहता हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे, असे सांगून हनुमान जयंतीला, उद्या घराबाहेर न पडण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, तसेच धार्मिक कार्याक्रम घरीच करावे असेही त्यांनी म्हटले आहे.


 


हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना संसर्गाची  साखळी  तोडणे आणि नागरिकांचा जीव वाचवणे हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येकाचे आज एकमेव कर्तव्य आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणे, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणे, कोरोनाला प्रसाराची संधी न देणे आणि कोरोनाची साखळी तोडणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, तसेच धार्मिक कार्य घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


 


कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असून ही बाब चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवले पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. बंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकले जाईल. कोरोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोना प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.


000


Popular posts
जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी पतसंस्था घेणार – शेखर चरेगांवकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा
शासकीय कर्मचारी,व अधिकाऱ्यांची सुरक्षितता जपण्या साठी त्यांना या सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे जल संपदामंत्री,व सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री ना.जयंतराव पाटील
Image
अवैध मद्य विक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरू; एका दिवसात सुमारे 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त