मसूर : आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटूंबियांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम कटाक्षाने पाळा, असे आवाहन तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांनी केले, यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस वाहतूक करणान्या वाहनांना रिप्लेक्टर लावण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या, ___ जयश्री पाटील पुढे म्हणाल्या, सह्याद्रि कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील हे नेहमीच _वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी आग्रही असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रिच्या वाहनांना रिप्लेक्टर लावले जातात, त्यामुळे सह्याद्रिच्या ऊस वाहतूकीच्या वाहन मालकांना जास्त नियम सांगावे लागत नाहीत, परंतू तरीही प्रत्येकाने जबाबदारीने वाहन चालवावे, प्रवासादरम्यान वाहन चालकाने टेप रेकॉर्डर, मोबाईल आदींचा वापर टाळावा आणि वाहनांच्या वेग मर्यादचे भान ठेवावे व अपघात होवून नयेत म्हणून काळजी घ्यावी. तसेच राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना, उपलब्ध असलेल्या सेवा रस्त्यांचाच वापर करावा, दुचाकीस्वारांनी नेहमीच हेल्मेटचा वापर करावा व वाहन चालविताना मोबाईल वर बोलणे टाळावे व सुरक्षितेसाठी वाहतुकीचे नियम पाळावेत, ___ याप्रसंगी कारखान्यकडील ऊस वाहतूकीच्या ट्रॅक्टर-ट्रेलर व बैलगाड्यांना मान्यवरांच्या हस्ते रिप्ले क्टर लावण्यात आले. आणि बैलगाडी चालकांना मान्यवरांच्या हस्ते कारखान्याच्यावतीने प्लेिक्टर सह्याद्रि कार्यस्थळावर ऊस वाहतूकीच्या _ वाहनांना रिप्लेक्टर र लावताना जयश्री पाटील, __ मोहनराव पाटील, पी. आर. यादव, वसंतराव चव्हाण, संजय चव्हाण, नितीन साळुखे व मान्यवर. जॅकेटचे वाटप करण्यात आले. मुख्य शेती अधिकारी मोहनराव पाटील यांनी प्रास्ताविक केले, विकास अधिकारी वसंतराव चव्हाण यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. उप ऊसविकास अधिकारी संजय चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर पी, आर, यादव, सिव्हील इंजिनिअर उदय पाटील, पर्यावरण इंजिनिअर हेमंत माने, ऊस पुरवठा अधिकारी एन, एस, साळुखे, केनयार्ड सुपरवायझर बळवंत नलवडे, तानाजी सुर्वे, शेख, पोलीस कॉन्स्टेबल अमर नारवर, पोलीस नाईक शशिकांत खाडे, होमगार्ड दीपक गाडवे, अजिंक्य पाटील यांच्यासह ऊस वाहतूक कंत्राटदार, वाहन चालक, बैलगाडीवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'सह्यादिवर ऊस वाहतका वाहनांना लावले रिप्लेक्टर