संपादकीय पर्यटनासोबत पर्यावरणाचेही भान हवेचकोणत्याही छोटय़ा-मोठया आनंदाचे सेलिब्रेशन करणा-

कोणत्याही छोटय़ा-मोठया आनंदाचे सेलिब्रेशन करणा-या मंडळींसाठी चालू आठवडा म्हणजे पर्यटनाची पर्वणीच ठरावी. सालाबादप्रमाणे यंदाही नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्र किना-यावरील पर्यटनस्थळांना शौकिनांनी पसंती दिली आहे. नववर्ष आगमनाप्रीत्यर्थ कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात अनेकविध फेस्टिव्हल, सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठया प्रमाणात रेलचेल असते. गोव्यासह मुंबईमध्ये खास नववर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशांतून येणा-या पर्यटकांची संख्याही दरवर्षी वाढतेच आहे. वाढते पर्यटनही महसुलासाठी आणि स्थानिकांसाठी महत्त्वाचे, आर्थिक फायद्याचे ठरते. मात्र, गत काही वर्षापासून पर्यटकांमधील बेशिस्ती, वाहतूक कोंडी, पाणी, विजेचा मोठया प्रमाणातील वापर, प्लास्टिक बाटल्या, कचरा यांमुळे पर्यटनस्थळांची होणारी हानी, अस्वच्छता अशा सर्वच कारणांमुळे पर्यटन स्थळांवर प्रमाणित प्रवेश देणे अथवा पर्यटनस्थळेच काही काळ बंद ठेवणे, असे निर्णय घ्यावे लागत आहेत. मोठय़ा संख्येने येणा-या पर्यटकांना सामावून घेणे आता स्थानिक प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जात आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पायाभूत सोयी-सुविधा पुरत्या कोलमडून जात आहेत. पर्यटकांना सामावून घेण्यासाठी हॉटेल्सची संख्याही वाढू लागली आहे. परिणामी, एकेकाळी हिरवाईने नटलेली माथेरान, महाबळेश्वर, सीमला, उटीसारखी पर्यटनस्थळे आता सिमेंटची जंगले होऊ लागली आहेत. पर्यटनाच्या अतिरेकाला भारतातली पर्यटनस्थळे बळी पडत आहेत. याच कारणामुळे काही पर्यटनस्थळांवर, पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत, तर काही पर्यटनस्थळे काही काळासाठी बंद करण्यात आली आहेत. काही तरी 'थ्रील' करण्याच्या नादात आपण निसर्गाची अपरिमित हानी करत आहोत, ही बाब कोणाच्याही लक्षात येत नाही. पर्यटकांचा स्वर्ग ठरलेल्या गोव्यामध्येही हा अतिरेक पाहायला मिळतो. महाराष्ट्रात साता-याजवळील कास पठारावर फुललेली फुले बघण्यासाठी पर्यटक सातारा, महाबळेश्वरमध्ये दाखल होतात. मात्र, त्यांच्यामुळे तिथल्या निसर्गसौंदर्याला घरघर लागली आहे. कास पठारावर फुलणा-या फुलांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. इथली फुले पर्यटकांच्या पायाखाली चिरडली जाऊन नष्ट होऊ लागली आहेत. काही फुलांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत असला तरी अनेक गैरसोयींना | सामोरे जावे लागते आहे. स्वच्छ, पारदर्शी पाण्याच्या नद्या प्रदूषित | झाल्या आहेत. या नद्यांमध्ये प्लास्टिक आणि खाद्यपदार्थाच्या कचयाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. रस्त्यांवर पर्यटकांच्या बसेस आणि गाडय़ांची गर्दी झाल्यामुळे पर्यटनस्थळांचा श्वास घुसमटू लागला आहे. भारतात दहा वर्षापूर्वी पर्यटनातून मिळणा-या महसुलाचा वाटा अत्यंत तोकडा होता. मात्र, २०११ ते २०१५ आणि २०१५ ते २०१९ या टप्प्यांत शासन दरबारी अनेकविध उपक्रम, पर्यटनाला चालना देणा या योजनांची अंमलबजावणी केल्याने आता २०२० पर्यंत भारत पर्यटनासाठी जगात एक नंबरचा देश म्हणून उदयास येऊ शकेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. निसर्गाची हानी न होता केले जाणारे पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन, अशी निसर्ग पर्यटनाची साधी सोपी व्याख्या आता हौशी पर्यटकांनी केव्हाच मागे टाकली आहे. निसर्गाची धारणक्षमता ओळखून, स्थानिकांच्या शाश्वत विकासासाठी व पर्यटकांच्या आनंदासाठी निसर्ग पर्यटन राबविणे गरजेचे असून पर्यटक, व्यावसायिक व स्थानिक लोक या सर्वाची यात महत्त्वाची भूमिका आहे. एखाद्या पर्यटनस्थळी जाताना फक्त मौजमजा करायला न जाता, तेथील निसर्ग अभ्यासपूर्वक जाणून घेतला, तर त्याचा खरा आस्वाद आपल्याला घेता येईल. आपल्या कोणत्याही कृतीमुळे स्थानिक पर्यटनास बाधा पोहोचणार नाही, पर्यटनस्थळी स्वच्छता राहील व तेथील सौंदर्य अबाधित राहील, याची दक्षता पर्यटकांनी घेतली पाहिजे. पर्यटन व्यावसायिकांनी फक्त आपल्या फायद्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडली, तर उद्या हेच व्यवसाय बुडीत निघायला वेळ लागणार नाही व याची गत सोन्याचे अंडे देणा-या कोंबडीसारखी होईल. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सध्या यातले गांभीर्य अनुभवायला मिळते आहे. आपल्या व्यवसायामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण पडणार नाही तसेच स्थानिक पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. स्थानिक लोक हे या साधनसंपत्तीवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांनीही आपल्या परिसरात पर्यटनामुळे होणारे दुष्परिणाम टाळून विकास कसा साधता येईल हे पाहिले पाहिजे व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आज कित्येक पर्यटनस्थळी पर्यटकांचा धुडगूस चाललेला असतो. मद्यपान, मारामारी, डीजेच्या तालावर अर्धनग्न नाच हा प्रकार नेहमीचाच झाला आहे. खरे तर, महाराष्ट्रातच बेहोष करणारे एवढे निसर्गसौंदर्य आहे की, या कृत्रिम नशेची लोकांना का गरज लागते तेच कळत नाही. मद्यपानाचा आस्वाद घेऊन झाल्यावर टाकलेल्या बाटल्यांचा खच, खाद्यपदार्थ, प्लास्टिकचा कचरा हे दृष्य आज सर्वत्र दिसत आहे. काही ठिकाणांना पर्यटनस्थळांचा दर्जा लाभल्याने तेथे मानवनिर्मित उपद्रव या स्थळांची शांतता व सौंदर्य बिघडवत आहे. यातून आपल्या महाराष्ट्राचे वैभव असलेले गडकिल्लेही सुटले नाहीत. या ऐतिहासिक वास्तूंवर आपल्या येण्याची नोंद करून ठेवणारे महाभाग पर्यटक काही कमी नाहीत. पर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सध्या यातले गांभीर्य अनुभवायला मिळते आहे. आपल्या व्यवसायामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण पडणार नाही तसेच स्थानिक पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. स्थानिक लोक हे या साधनसंपत्तीवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांनीही आपल्या परिसरात पर्यटनामुळे होणारे दुष्परिणाम टाळून विकास कसा साधता येईल हे पाहिले पाहिजे व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आज कित्येक पर्यटनस्थळी पर्यटकांचा धुडगूस चाललेला असतो. मद्यपान, मारामारी, डीजेच्या तालावर अर्धनग्न नाच हा प्रकार नेहमीचाच झाला आहे. खरे तर, महाराष्ट्रातच बेहोष करणारे एवढे निसर्गसौंदर्य आहे की, या कृत्रिम नशेची लोकांना का गरज लागते तेच कळत नाही. मद्यपानाचा आस्वाद घेऊन झाल्यावर टाकलेल्या बाटल्यांचा खच, खाद्यपदार्थ, प्लास्टिकचा कचरा हे दृष्य आज सर्वत्र दिसत आहे. काही ठिकाणांना पर्यटनस्थळांचा दर्जा लाभल्याने तेथे मानवनिर्मित उपद्रव या स्थळांची शांतता व सौंदर्य बिघडवत आहे. यातून आपल्या महाराष्ट्राचे वैभव असलेले गडकिल्लेही सुटले नाहीत. या ऐतिहासिक वास्तूंवर आपल्या येण्याची नोंद करून ठेवणारे महाभाग पर्यटक काही कमी नाहीत. पर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. जगातील काही देशांची तर बहुतांशी अर्थव्यवस्थाच तेथील पर्यटनावर | अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील पर्यटनही गेल्या दशकभरात २५ त ३० टक्क्यांनी वाढले आहे आणि त्यामुळे मिळणा या परकीय चलनात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक पर्यटन संघटना पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने या क्षेत्राच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन करते, तसेच पर्यटन विकासासाठी कार्य करते. भारतासह या संघटनेचे १५५ सदस्य आहेत. दरवर्षी पर्यटन दिनाच्या | निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. वर्षभरासाठी एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन जगभरात करण्यात येते. यापूर्वी सांस्कृतिक बंध, पर्यटन आणि जैवविविधता, महिलांसाठी संधी, पर्यावरण बदलास प्रतिसाद, क्रीडा आणि पर्यटन, खासगी क्षेत्राचा सहभाग अशा विविध विषयांवर विचार करण्यात आला आहे. पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिस-या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. गतवर्षी १२० कोटी पर्यटकांनी जगभरातील विविध स्थानांना भेटी जाते. वर्षभरासाठी एक संजालमा निखित नि त्यानुसार कार्यक्रम, गतवर्षी १२० कोटी पर्यटकांनी जगभरातील विविध स्थानांना भेटी दिल्या आहेत. ही संख्या २०३० पर्यंत १८० कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज जागतिक पर्यटन संघटनेने व्यक्त केला आहे. या संधीचा उपयोग करून शाश्वत विकासाला चालना देता येणे शक्य आहे. पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणा-या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो. सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या माध्यमातून नागरिकांना एकमेकांशी जोडण्याचे कामदेखील पर्यटनाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे पर्यटन विकासात नागरिकांचा जेवढा सहभाग वाढेल, तेवढीच त्या भागातील अर्थकारणालादेखील गती मिळते. मात्र, फक्त अर्थकारण हा हेतू न बाळगता पर्यावरण रक्षण, संवर्धन आणि परिसरातील शांततेचाही विचार होणे यात अभिप्रेत आहे. याची काळजी पर्यटनाला घराबाहेर पडणा-या प्रत्येक सूज्ञ पर्यटकाने घ्यायलाच हवी.