कर पशुखाद्यला पर्याय म्हणून दूध उत्पादकांनी 'अझोला'चा वापर करावा : वसंतराव जगदाळे कर 'अझोला'चा वापर करावा मसूर : सध्या कडब्याचे वाढलेले दर, पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे सर्वसामान्यांना शेतीला जोडधंदा असणारा दूध व्यवसाय परवडत नाही. दूध व्यवसायात उत्पादनखर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हा व्यवसाय तोट्यात जात आहे. त्यासाठी पशुखाद्याला पर्याय म्हणून दूध उत्पादकांनी अझोला चा वापर करून उत्पादनखर्चात बचत करावी, असे आवाहन कोयना सहकारी दूध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे यांनी __ येणके ता. कराड येथे श्री हनुमान दूध संस्था व माणकेश्वर महिला दूध संस्थेत मार्गदर्शन करताना ते _बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आप्पासाहेब गरुड होते. यावेळी कोयना दूध संघाचे संचालक रामचंद्र बल्लाळ, संस्थेचे चेअरमन शिवाजी गरुड, व्हाईस चेअरमन धनाजी गरुड, माणकेश्वर दूध संस्थेच्या चेअरमन प्रतिभा गरुड, व्हाईस चेअरमन उमा कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. जगदाळे पुढे म्हणाले, माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या दूरदृष्टीने कोयना दूध संघात आधुनिक मशिनरी बसली असून संघाने उत्पादन खर्चात बचत केल्यामुळे दूध उत्पादकांना गाईला ७० पैसे तर म्हैशीला ९० पैसे दूध दर फरक दिला आहे. यापुढेही कोयना दूध संघ सर्वसामान्य दूध उत्पादक व प्राथमिक सहकारी दूध संस्थाच्या पाठीशी राहील. कोयना संघाचे पशुधन व्यवस्थापक डॉ. विजय नष्टे म्हणाले, दूध व्यवसायातील बहुतांश कामे महिला केले. गरुड व मान्यवर. करत असतात त्यांना आधुनिक दुग्ध व्यवसाय बाबत व जनावर व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केल्यास दूध व्यवसाय आणखी किफायतशीर होईल. सचिव आनंदराव गरुड यांनी प्रास्ताविक केले. व्हाईस चेअरमन धनाजी गरुड यांनी स्वागत केले. संस्थेचे चेअरमन शिवाजी गरुड यांनी आभार मानले. यावेळी संघाचे सहाय्यक व्यवस्थापक तानाजीराव पाटील, संकलन सुपरवायझर अण्णा यादव, संस्थेचे संचालक तानाजी गरुड, जयराम गरुड, प्रभाकर गरुड, दत्तात्रय गरुड, माणकेश्वर दूध संस्थेच्या संचालिका विजया चिंचकर, जयश्री लोकरे, पूजा महाजन, वैशाली पवार, मनीषा गरुड, संगीता जाधव, दिपाली गरुड, सचिव प्रियांका गरुड यांच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते.
पशुखाद्यला पर्याय म्हणून दूध उत्पादकांनी 'अझोला'चा वापर करावा : वसंतराव जगदाळे