ओगलेवाडी : रेल्वेच्या हद्दीत असलेला मालधक्का ते कराड रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण करुन पक्का रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी हजारमाची, ता. कराड ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना कराड पंचायत समितीचे माजी ग्रामपंचायतीचे सदस्य सूर्यभान माने आदी मान्यवर उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे मालधक्का ते कराड रेल्वे स्टेशन रस्त्या संदर्भात निवेदने देण्यात आलेली आहेत. तरीदेखील रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. मालधक्क्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या मालाची वाहतूक करण्यासाठी हा रस्ता महत्वाचा कमीतकमी आठ ते नऊ साखर ने नऊ साखर कारखान्यांची साखर वाहतूक होत असते. त्याचबरोबर या मालधक्क्यावर सर्व प्रकारची खते, सर्व सिमेंट कंपन्यांचे सिमेंट, तसेच शासकीय माल वाहतूक देखील या मालधक्क्यावरुन होत असते. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा हा मालधक्का आहे. या रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने हजारमाचीचे सरपंच, ग्रामस्थ यांनी वेळोवेळी रेल्वे दिलेले आहे. मात्र, आजपर्यंत हा । दिलेले आहे. मात्र, आजपर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला नाही. तरी आपण या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन सदरचा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा. अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला दि. २६ जानेवारी २०२० च्या आत या रस्त्याचे काम सुरु केल्यास रेल रोको आंदोलन करावे लागेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनावर राहिल, असे निवेदनात म्हटले आहे.
हजारमाची ग्रामपंचायतीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन