कृष्णा कॉलेजच्या विद्यार्थीनीने केला अपंग मुलांसोबत वाढदिवस साजरा

कराड : अपंग दिन व अपंग सप्ताहाचे व स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृष्णा वैद्यकिय महाविद्यालय, कराड येथील विद्यार्थिनीने सलग चौथ्या वर्षी आपला वाढदिवस कराड मधील मतिमंद व अपंग मुलांना खाऊ वाटप करून साजरा केला. आजकाल कॉलेज तरूण -तरूणींमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टी व इतर वायफळ खर्च करून फुल टू। धमाल असा वाढदिवस साजरा करून मित्र-मैत्रिणींना खूष करण्याचा प्रयत्न केला जातो. पण सामाजिक बांधीलकीचा विषय कुणाच्या डोक्यालाही शिवत नाही. परंतू येथिल कृष्णा वैद्यकिय महाविद्यालयात फिजीओथेरपीचे शिक्षण घेत असलेल्या कु. श्रध्दा आनंद - विद्यार्थीनीने आपला वाढदिवस साजरा केला तो अनोख्या पध्दतीने. वाढ दिवसाच्या होणाऱ्या इतर खर्चाला फाटा देत कु. श्रध्दा हि कराड येथील सोमवार पेठ व सैदापुर येथील अपंग, मतीमंद व मुकबधीर । शाळेत मागील तीन वर्षापासून मुलांना गरजेचे असे शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वहया, पेन, चित्रकला वहया, रंगपेटी संच व खाऊ स्वतः खरेदी करून वाढदिवसाच्या दिवशी अत्यंत आनंदाने त्याचे शाळेत जाऊन मुलांना वाटप करत आहे. या ही १ वर्षी कु. श्रध्दा हिने आई सौ.अश्विनी, वडिल आनंद व भाऊ कु.व्यंकटेश यांच्या समवेत मुलांना खाऊ वाटप करून मंतीमंद मुलांच्या हाताने केक कापून वाढदिवस मोठया आनंदाने साजरा केला. खाऊ स्वीकारताना ज्या मुलांना बोलता येत नाही व ऐकूही येत नाही अशा मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान हे अतिशय अतुलनीय व दैवी साक्षात्कारासारखेच आहे मागील ४ वर्षापासुन हया पध्दतीने आपला वाढदिवस साजरा करत आहे. अशी भावना कु.श्रध्दा हिने त्यानिमित्ताने व्यक्त केली. वास्तविक पहाता आजकालच्या गतीमान जीवनशैलीत अशा गोष्टींचा विसर सर्वांना पडत असतो. पण कु.श्रध्दा हिने केलेला अनोखा उपक्रम हा इतरांना निश्चीतच प्रेरणा देणारा ठरणारा आहे.


Popular posts
जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी पतसंस्था घेणार – शेखर चरेगांवकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा शब्ब-ए-बारातसाठीही बाहेर न पडण्याचे आवाहन हनुमान जयंतीला आपापल्या घरातच थांबा -उपमुख्यमंत्री अजित पवार
शासकीय कर्मचारी,व अधिकाऱ्यांची सुरक्षितता जपण्या साठी त्यांना या सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे जल संपदामंत्री,व सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री ना.जयंतराव पाटील
Image
अवैध मद्य विक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरू; एका दिवसात सुमारे 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त