कराड : हजारमाची, ता. हजारमाचीचे कराड येथे यशवंतनगरच्या सह्याद्रि कल्याण सहकारी साखर कारखान्याच्या पंचायत माध्यमातून ओढ्याचे खोलीकरण उपसभापती व रुंदीकरणाच्या कामाचा प्रारंभ पटेलनुकताच करण्यात आला. यामुळे लालासाहेब नव्याने बांधण्यात येणाऱ्या वासुदेव बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता काटवटेवाढणार असून त्याचा परिसरातील विभाग शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ग्रामस्थ कारखाना कार्यक्षेत्रातील व दुष्काळग्रत गावातील ओढ्यामधील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी तसेच जलसंधारणाच्या कामासाठी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने जेसीबी, पोकलॅन मशीन ग्रामस्थांचीया मागणीनुसार उपलब्ध करुन देण्याचे धोरण कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील व संचालक मंडळाने ठरवले आहे. त्यानुसार हजारामची येथील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यावेळी प्रीतिसंगम बँकेचे संचालक विश्वास पाटील, हजारमाचीचे माजी उपसरपंच कल्याण डुबल, धनाजी रमाने, पंचायत समितीचे माजी उपसभापती बबन पवार, साजीद पटेल, राजू माने, दत्ता डुबल, लालासाहेब घाडगे, शब्बीर शेख, वासुदेव साळुखे, रतन कोरडे, राजू काटवटे, कारखान्याचे वाहन विभाग प्रमुख मोहन पिसाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.