कराड तालुक्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण महारुगडेवाडी गावसह परिसर पूर्ण लोकडाऊन

उंडाळे
 महारुगडेवाडी (ता. कराड) येथील कृष्णा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा रिपोर्ट  पॉझिटिव आल्याने  गावासह तालुक्यात  एकच खळबळ उडाली आहे तांबवे गावानंतर कराड तालुक्यातील दक्षिण भागातील एका डोंगरी भागात असणाऱ्या  खेडेगावात हा रुग्ण सापडल्याने कोरोनाचे लोण आता शहरी भागातून ग्रामीण भागात वाढत आहे प्रशासनाने महारुगडेवाडी गावाकडे धाव घेत योग्य त्या उपाय योजना करून नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना केल्या आहेत


कराड तालुक्यातील महारुगडे वाडी येथील एक व्यक्ती मुंबई येथे वास्तव्यास आहे कोरोना  विषाणूचा  संसर्ग वाढतच चालला आहे त्यातच   28 मार्च रोजी ही व्यक्ती आपल्या जावयाच्या रिक्षांमधून मुलीसह दोन नातवंडा बरोबर  पाच तास प्रवास करून गावाकडे आला होता  त्यानंतर त्यांना त्रास होत असल्याने ही व्यक्ती जवळपासच असलेल्या एका खासगी रुग्णालयात गेली असता या व्यक्तीची लक्षणे कोरोना  सदृश असल्याने खासगी डॉक्टरांनी त्यांना तपासणी करण्याचा सल्ला दिला त्यानंतर सदर व्यक्ती दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयात जाऊन तात्पुरती उपचार घेतले तरीही त्रास वाढत असल्याने मागील दोन दिवसापूर्वी ही व्यक्ती कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल झाली त्याच्या घशातील श्रावाचे नमुने पुणे येथे पाठवले असता आज सकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला यामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली ही माहिती महारुगडे वाडी गावासह परिसरात वार्‍यासारखी पसरली त्यानंतर गावासह पूर्ण परिसर बंद  करण्यात आला तसेच गावच्या हद्दी सील  करण्यात आल्या आहेत  या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वच नागरिकांना तपासणीसाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल  करण्यात आले  आहे 


कोरोना पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती आपल्या जावया सोबत गावाकडे रिक्षाने आली होती हा जावई गावाशेजारीलच जिंती तालुका कराड येथील असून या गावात ही भीतीचे  वातावरण पसरले आहे


Popular posts
जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी पतसंस्था घेणार – शेखर चरेगांवकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा शब्ब-ए-बारातसाठीही बाहेर न पडण्याचे आवाहन हनुमान जयंतीला आपापल्या घरातच थांबा -उपमुख्यमंत्री अजित पवार
शासकीय कर्मचारी,व अधिकाऱ्यांची सुरक्षितता जपण्या साठी त्यांना या सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे जल संपदामंत्री,व सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री ना.जयंतराव पाटील
Image
अवैध मद्य विक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरू; एका दिवसात सुमारे 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त