शिवचरित्राचे वाचन, चिंतन होणे गरजेचे : अतुल पाटील

कराड : भरकटलेल्या समाजव्यवस्था पूर्वपदावर आणावयाची असेल तर शिवचरित्राचे वाचन, चिंतन होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते अतुल पाटील यांनी केले. येथील श्री व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने नगरपालिकेच्या शाळा क्र.७ मध्ये शिवव्याख्याते अतुल पाटील यांचे 'छत्रपती शिवरायांचे आठवावे रुप' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधक सी. डी. पवार होते. यावेळी डॉ. शिरीष देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अतुल पाटील म्हणाले, शाळा, महाविद्यालये यामध्ये महिन्यातून एक दिवस ऐतिहासिक महापुरुषांच्याबद्दल कार्यक्रतम राबविण्यात यावा. त्यामुळे विद्यार्थी, युवापिढीला योग्य दिशा मिळेल. भरकटलेली शिवचरित्राचे वाचन, चिन्तन त्योथे गिरीप देशपांडे समाजव्यवस्था पुर्वपदावर आणावयाची असेल तर शिवचरित्राचे वाचन, चिंतन होणे व घरोघरी शिवचरित्राचे पारायण होणे आवश्यक असून लहान मुलांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी सी. डी. पवार, डॉ. गिरीष देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. भोसले सर यांनी स्वागत करुन आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल उकिरडे, सुरेश अतनुर, ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Popular posts
जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी पतसंस्था घेणार – शेखर चरेगांवकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आरोग्यदिनानिमित्त शुभेच्छा
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा शब्ब-ए-बारातसाठीही बाहेर न पडण्याचे आवाहन हनुमान जयंतीला आपापल्या घरातच थांबा -उपमुख्यमंत्री अजित पवार
शासकीय कर्मचारी,व अधिकाऱ्यांची सुरक्षितता जपण्या साठी त्यांना या सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे जल संपदामंत्री,व सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री ना.जयंतराव पाटील
Image
अवैध मद्य विक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरू; एका दिवसात सुमारे 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त