सह परिसरात कासेगांव: कासेगांवकरांनी आपल्या लाडक्या सुपुत्राचे कासेगांव येथे जोरदार स्वागत केले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांचे प्रथमच वाळवा तालुक्यात आगमन झाले. त्यांनी कासेगाव येथील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पदयात्री स्मारकात स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यांचे इस्लामपूरला येताना येवलेवाडी फाटा, केदारवाडी, नेर्ले, पेठ, कापूरवाडी आदी जागो-जागी ही मोठ्या उत्साहात स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ना.पाटील यांचे हेलिकॉप्टरने दुपारी ४ वाजता कासेगांव येथे कॉलेजच्या मैदानावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत त्यांचे सुपुत्र प्रतिक दादा पाटील, राजवर्धन पाटील (भैय्या), तसेच आ.मानसिंगभाऊ नाईक, जेष्ट नेते जनार्धनकाका पाटील होते. येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच किरण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी गावामध्ये जावून ग्रामदैवताचे दर्शन घेतले. स्व.बापूंच्या पदयात्री स्मारका मध्ये त्यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व कृष्णा कॉलेजच्या घोषणांच्या निनादात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुहासिनी त्यांचे औक्षण केले. त्यांनी स्व.बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. येथे कासेगाव ग्रामस्थ, कासेगांव शिक्षण संस्था, सेवकांची पतसंस्था, सेवा सोसायट्या, अनेक संस्था व व्यक्तींनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच आष्टा, वाटेगांव, तांबवे, कारंदवाडी आदी विविध गावातून आलेल्या मान्यवरांनीही त्यांना पुष्पहार देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी उदयबापू पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले, उपसभापती सुरेश गावडे, शामरावकाका पाटील, सुभाषराव आडके, विलासराव पाटील, दाजी गावडे, दिलीप पवार, प्रा.कृष्णा मंडले, प्रताप पाटील, बाळासो गावडे, शिराळ्याचे विजयराव नलवडे, माजी सभापती रविंद्र बर्डे, ग.चि.ठोंबरे, आटपाडीचे आनंदराव पाटील, पै.अशोक मोरे, तसेच कासेगांवसह शेजारच्या गावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.
ना.जयंत पाटील यांचे कासेगाव सह परिसरात जोरदार स्वागत कासेगांव: कासेगांवकरांनी आपल्या लाडक्या सुपुत्राचे